Advertisement

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?

मुंबईतील ७ तलावांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे.

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईतील ७ तलावांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सुरुवातीला मुंबईतील तुलसी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर विहार तलावही ओव्हरफ्लो झाला. आता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार तानसा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. 

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. पालिकेने ट्विटपवरून याबाबत माहिती दिली. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव २६ जुलैला पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लागला, असे ट्विट पालिकेने केले आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावानंतर आता विहार तलावही भरला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुळशी तलावापाठोपाठ आता विहार तलाव भरला आहे.(Vihar Talav which supplies water to Mumbai overflows)

मुंबईकरण्णा पानीसपरी कर्ण-या 7 तलावत विहार तलाव आज (26 जुलै 2023) मध्यरात्री 00.48 मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लगा आहे, असं ट्विट करत पालिकेने ही माहिती दिली. 



हेही वाचा : 

मुंबईत 8 दिवसांत तिसऱ्यांदा 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद



बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या मध्यरात्री 00.48 वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

सध्या १० टक्के पाणीकपात आहे

मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही पाणीकपात मागे घेतली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा

26 जुलै बुधवारी मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा