Advertisement

नवी मुंबईत दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच दुकानं खुली

चित्रपट, नाटय़गृह, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद राहतील. या नियमांचा दुकानदारांनी भंग केला तर, कोरोना साथ संपेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

नवी मुंबईत दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच दुकानं खुली
SHARES

नवी मुंबईत (navi mumbai) आता लाॅकडाऊन (lockdown) चे नियम शिथील करण्यात आले आहेत.  दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच दुकानं (shops) सुरू असणार आहेत. नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटत चालली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या पन्नास पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal) प्रशासनाने मंगळवारपासून काही आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. कोरोना चाचणीत दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधितांचे प्रमाण तसेच प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरलेल्या असतील तर निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महपालिका प्रशासनाने नवी नियामवली जाहीर केली आहे.

पालिकेच्या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवेसह इतर एकल दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. शनिवार व रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. इतर दुकाने बंद राहणार आहेत. चित्रपट, नाटय़गृह, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद राहतील. या नियमांचा दुकानदारांनी भंग केला तर, कोरोना साथ संपेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच दुपारी २ वाजेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार वस्तूंच्या घरपोच सेवेस परवानगी असणार आहे. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. त्या ठिकाणी जास्तीच्या उपस्थितीची आवश्यकता असेल तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

शहरातील उपहारगृहांमध्ये पार्सल सुविधा ठेवण्यास परवानगी असणार आहे. पण उपहारगृहांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास बंदी कायम असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा