Advertisement

ऑमिक्रॉनची भिती, रेल्वे स्थानकांवर चाचण्या वाढवल्या

मुंबईत ओमिक्रॉनच्या पाच रुग्णांची नोंद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑमिक्रॉनची भिती, रेल्वे स्थानकांवर चाचण्या वाढवल्या
SHARES

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत पुन्हा एकदा चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. रेल्वेनं प्रवास करून  शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-१९ चाचणी मोहीम वाढवली आहे. मुंबईत ओमिक्रॉनच्या पाच रुग्णांची नोंद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनानं शहरातील विविध रेल्वे स्थानकांवर तपासणी अधिक तीव्र केली आहे. अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर ४-५ चाचणी बूथ स्थापित केले आहेत. शिवाय, इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची चाचणी घेतली जात आहे.

याशिवाय, मुंबई प्रशासनानं शहरातील विमानतळावर उतरणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांना ७२ तासांमधील नकारात्मक RT-PCR अहवाल सोबत ठेवणं बंधनकारक केलं आहे.

शिवाय, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावीत एक ओमिक्रॉन पॉझिटिव्ह केस आढळली. त्यामुळे पालिकेच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. स्थानिक प्रशासनाकडून याठिकाणी मास टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. या चाचण्या मोफत केल्या जात आहेत.

धारावीतील ८० टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालये वापरते. त्यामुळं सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ ते ६ वेळा सॅनिटायझेशन करण्यात येईल. तसंच याठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोबाईल व्हॅक्सिन सेंटर्स तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच धारावीतील ३५० क्लिनीकची धारावी वॉरियर्सची टीम पुन्हा सक्रिय केली जाणार आहे.

यापूर्वी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं ‘उच्च धोकादायक’ देशातून शहरात येणाऱ्या प्रवाशांचे योग्य निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक नवीन संच जारी केला आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी मुंबईकरांना पूर्ण लसीकरण करणं प्रशासकिय संस्थेनं बंधनकारक केले आहे.



हेही वाचा

राज्यात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १८ वर; नागपुरातही शिरकाव

ऑमिक्रॉनला आळा घालण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट-२

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा