Advertisement

बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या लॉनवर पडणार हातोडा ?


बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या लॉनवर पडणार हातोडा ?
SHARES

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन वाढदिवसाच्या दिवशी जुहूच्या प्रतीक्षा बंगल्याच्या लॉनजवळ येऊन अनेक चाहत्यांना अभिवादन करतात. मात्र, या लॉनवर अाता लवकरच हातोडा पडणार आहे. कारण महापालिकेतर्फे अंधेरीतील जुहू भागातील संत ज्ञानेश्वर मार्गाचं रूंदीकरण करण्यात येणार असल्यानं प्रतीक्षा बंगल्याची कंपाऊंड वॉल १५ फुटांपर्यंत पाडावी लागणार आहे. 


रस्त्याचं विस्तारीकरण 

पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, जुहूच्या चंदन सिनेमापासून लिंक रोडपर्यंत जोडणारा संत ज्ञानेश्वर मार्ग ४५ फुट रूंद आहे. सकाळ व संध्याकाळच्या वेळी याठिकाणी बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असल्यानं पालिकेनं सहा महिन्यांपूर्वी या मार्गाचं विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संत ज्ञानेश्वर मार्गाचं १५ फुट विस्तारीकरण करण्यात येणार अाहे.  यामुळं हा मार्ग ६० फुट रुंद होणार आहे. या मार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असं पालिकेचं म्हणणं आहे.


उत्तर नाही

 या मार्गावर अमिताभ बच्चन, उद्योजक केवी सत्यमूर्ती यांच्यासह इतर अनेक बंगले असून यातील बऱ्याच जणांना पालिकेतर्फे नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीवर उत्तर देताना केवी सत्यमूर्ती यांनी मी माझ्या बंगल्याचा भाग देणार नाही, असं सांगितलं आहे. परंतु या नोटीसीवर बच्चन यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. हेही वाचा - 

झेंडेंना हवं म्हाडाचं घरं, गोरेगावसह दादरपर्यंत भरले १० अर्ज

म्हाडा लाॅटरी : ग्रँट रोडमधील कोट्यावधींच्या ३ घरांसाठी १३६ अर्ज
Read this story in हिंदी
संबंधित विषय