Advertisement

दिवाळीप्रमाणेच गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला

दिवाळीप्रमाणेच गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा
SHARES

गौरी गणपतीप्रमाणेच दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिळा’ देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणे, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल १०० रुपयांना देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र कॅसिनो कायदाही रद्द करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet meeting) महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यात कॅसिनोचा (Casino Act) कायदा रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

गृह विभागाने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. यासोबत गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा (anandacha siddha) पुरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकाला एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा सरकारकडून पुरवण्यात येणार आहे.

राज्यातून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 1976 पासून राज्यात हे विधेयक अस्तित्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधायक रद्द करण्याची घोषणा केली होती.

मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी फेब्रवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती. आपल्या शेजारी राज्य असलेल्या गोवा, सिक्किम, मकाऊ, नेपाळमध्ये कॅसिनो गेमिंगला परवानगी असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाल्याचे पत्रात म्हटले होते. राज्यात कॅसिनो सुरू करावा यासाठी अनेक जण कोर्टात गेलेले आहेत. मात्र त्याआधीच राज्य सरकारने हा अधिनियम रद्द केला आहे.

कॅबिनेट बैठकीतील निर्णय

  • राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाड्या आता मुख्य रस्त्याने जोडल्या जाणार आहेत.
  • गौरी गणपती, 1 किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल (अन्न आणि नागरी पुरवठा) साठी प्रत्येकी 100 रुपये दराने दिवाळी आनंद शिधा
  • आयटीआयमधील कारागीर शिकाऊंच्या शिक्षण शुल्कात भरीव वाढ. आता तुम्हाला दरमहा रु. 500 (कौशल्य विकास) मिळतील.
  • फोर्ट येथील मुंबई प्रेस क्लबच्या पुनर्विकासाला परवानगी (महसूल विभाग)
  • महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करा (गृह विभाग)
  • केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याच्या वाटा वाढ (महिला व बाल विकास)
  • सहकारी संस्था आणि सभासदांचा (सहकार विभाग) रद्द करण्याचा अध्यादेश 2023
  • दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांची सुधारित निवृत्ती वेतन
  • मंडणगढ येथील दिवाणी न्यायालय (कायदा व न्याय विभाग).



हेही वाचा

म्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, जाणून घ्या कारण

महारेरा सीसी-ओसी असलेल्या इमारतींना नोंदणी प्रमाणपत्र देणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा