Advertisement

मुंबईतील खड्ड्यांची गिनीज बुकमध्ये नोंद ?

मुंबईतील खड्ड्यांची जागतिक विक्रम म्हणून नोंद करावी, असं पत्र अंधेरीतील नवीन लाड यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अाणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डला लिहिलं अाहे.

मुंबईतील खड्ड्यांची गिनीज बुकमध्ये नोंद ?
SHARES


मुंबईतील खड्ड्यांमुळे नागरिक तसंच वाहनचालक हैराण झाले अाहेत. खड्ड्यांवरून सर्वोच्च न्यायालयानंही मुंबई महापालिकेला फटकारलं अाहे. त्यानंतर पालिका अायुक्त अजोय मेहता यांना स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याच्या कामाकडं लक्ष द्यावं लागलं अाहे.  अाता या खड्ड्यांची जागतिक विक्रम म्हणून नोंद घ्यावी यासाठी अंधेरीतील नवीन लाड सरसावले अाहेत.

नवीन लाड यांनी मुंबईतील खड्ड्यांची जागतिक विक्रम म्हणून नोंद करावी, असं पत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अाणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डला लिहिलं अाहे. तसंच मुंबई शहरात सर्वाधिक खड्डे असल्यामुळे पालिका अायुक्त अजोय मेहता यांचं नावही रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवावं असंही लाड यांनी पत्रात म्हटलं अाहे.


२० हजार खड्डे ?

नवीन लाड यांनी संपूर्ण मुंबईत २० हजार खड्डे असल्याचा दावा केला अाहे. खड्ड्यांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्याच्या पत्रासह त्यांनी ५ डाॅलरची रक्कमही भरली अाहे. पालिका अायुक्तांना गिनीज बुककडून जेव्हा प्रमाणपत्र मिळेल तेव्हा त्यांना अापल्या जबाबदारीची जाणीव होईल. अाणि त्यानंतर मुंबईतील खड्डे दुरूस्त होतील, असं नवीन लाड यांनी म्हटलं अाहे.


१२ अाठवड्यात पडताळणी

पुढील १२ अाठवड्यांमध्ये गिनीज बुकचे अधिकारी नवीन लाड यांच्या दाव्याची पडताळणी करतील. जर मुंबईतील खड्ड्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्यास या शहराबरोबरच येथील नागरिकांसाठीही ही लाजीरवाणी बाब असेल.

सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

मुंबईतील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची दखल घेतल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जात असताना सरकार काय करत अाहे, अशा शब्दात न्यायालयानं फटकारलं अाहे. याबाबत एक अहवालही सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं अाहे. 



हेही वाचा - 

वाहतुकदारांचं आंदोलन 5 व्या दिवशीही सुरूच

लोअर परळ पूल बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा