Advertisement

अंधेरी सब वेमध्ये पावसाळ्यात रात्रीच्यावेळी ‘नो एन्ट्री’


अंधेरी सब वेमध्ये पावसाळ्यात रात्रीच्यावेळी ‘नो एन्ट्री’
SHARES

मुंबईत मुसळधार पाऊस (mumbai rains) झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेक सखल भागांत पावसाचं पाणी सचल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. शिवाय, चाकरमान्यांचे ही हाल होतात. दरम्यान या सखल भागातील एक असलेल्या अंधेरी (andheri) सब वे मध्ये पावसाळ्यात (Rain) पाणी साचत असल्यामुळे वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून तब्बल महिनाभर अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

या निर्णयानुसार, २१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमधून प्रवास करता येणार नाही. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत हा मार्ग बंद राहील. मुंबईत जरासा जास्त पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये लगेच पाणी साठते. अशावेळी रात्री पाऊस सुरु असल्यास साचलेल्या पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्याच १० दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते. हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (mumbai rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. 

आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा १०० किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा