गोळीबार रोड फुटपाथचा अखेर चालण्यासाठी वापर होणार!

  Khar (East)
  गोळीबार रोड फुटपाथचा अखेर चालण्यासाठी वापर होणार!
  मुंबई  -  

  मुंबईतील पदपथावरील दुकानदार आणि फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली असून, खार पूर्व येथील गोळीबार नगर तसेच जवाहरनगर येथील पदपथावर सर्व दुकानांच्या वाढीव बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करुन पदपथ पादचाऱ्यांना चालण्यास मोकळे करुन देण्यात आले आहेत.

  वांद्रे पूर्व भागातील बेहराम पाड्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर सोमवारी खार पूर्वमधील जवाहर नगर, जेपी नगर तसेच मंगळवारी गोळीबार रोडवरील  पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या बंदोबस्तात या पदपथांवर वाढीव दुकानांचे फलक यांच्यावर प्रथम कारवाई करण्यता आली. याबरोबरच रस्ते व पदपथ यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर तसेच त्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी हातगाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या हातगाड्यांवर जागीच बुलडोझर चढवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये परवाना विभागासह दुकाने व आस्थापना, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.


  • दुकांनाचे फलक, ओट्यांवरील कारवाई : 102
  • तोडलेले स्टॉल्स : 10
  • झोपड्या आणि बाकड्यांवरील कारवाई : 52
  हे देखील वाचा

  अतिक्रमण हटवताना सापडला ब्रिटीशकालीन दगड


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.