• वाकोल्यातील फेरीवाल्यांवर अखेर कारवाई
  • वाकोल्यातील फेरीवाल्यांवर अखेर कारवाई
SHARE

वाकोला ब्रिजजवळील पाठक शाळेनजीकच्या रस्त्यावर बसलेले फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या एच/पूर्व विभागाने गुरुवारी कारवाई केली. या कारवाईत दुकानांची अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. तर फेरीवाल्यांना हटवण्यात आले.

वाकोला परिसरातील मिठी नदीच्या बाजूला फेरीवाल्यांचा विळखा असल्याचे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने दिले होते. येथील फेरीवाले सगळा कचरा मिठी नदीतच टाकत असल्याने फेरीवाल्यांपासून मिठीची सुटका करा, अशी मागणी वाकोला 'एएलएम'च्या माध्यमातून करण्यात येत होती. या मागणीची गंभीर दखल घेत अखेर महापालिकेने येथील फेरीवाल्यांना हटवले आहे.'वाकोला एएलएम'ने वारंवार मागणी केल्यानंतर अखेर महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर पाठक मार्ग मोकळा श्वास घेत असून रहिवाशांना चालण्यासाठी पदपथ मोकळे झाले आहेत.


- सुधाकर मोरे, सदस्य, वाकोला एएलएम


दुर्घटनाग्रस्तांचे दुकान हटवले

दुर्दैवाने या कारवाईत महाड पूल दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांचे रस्त्यावरील दुकानही हटविण्यात आले. त्यामुळे या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे. या कुटुंबाला पर्यायी जागा देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

ऑगस्ट 2016 मध्ये सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाकोल्यातील मिरगळ कुटुंबाने दोन कर्ते पुरुष गमावले होते. त्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यांना 4 बाय 3 फुटांचे दुकान रस्त्यावर टाकून दिले होते. पण गुरुवारच्या कारवाईत हे दुकान जमीनदोस्त करण्यात आले.आमचे दुकान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे. कुठलेही आर्थिक उत्पन्न नसल्याने लहान मुलांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. आमच्यावरील अन्याय प्रशासनाने त्वरीत दूर करुन पर्यायी जागा द्यावी.


- रेणुका मिरगळ, दुकानदार
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या