Advertisement

तुंबईच्या ठिकाणी पूरनियंत्रण अधिकारी?

जिथं जिथं पाणी तुंबतं, त्याठिकाणी पूर नियंत्रण अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

तुंबईच्या ठिकाणी पूरनियंत्रण अधिकारी?
SHARES

सुरूवातीच्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. असे प्रकार सतत घडू नये म्हणून खड्डयांच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्या प्रमाणे रस्ते अभियंता ही संकल्पना मांडण्यात आली. त्याचप्रमाणे जिथं जिथं पाणी तुंबतं, त्याठिकाणी पूर नियंत्रण अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पूरनियंत्रण अधिकारी नियुक्त केल्यास त्याच्या जबाबदारी निश्चित होईल आणि संबंधित अधिकारीही त्याठिकाणी पाणी तुंबणार नाही याची काळजी घेईल, असं त्यांनी म्हटलं आहे.


तर, मुसळधार पावसात काय होईल?

मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा केला. परंतु त्यानंतरही शनिवारी, गुरुवारी व त्यानंतरच्या शनिवारी पडलेल्या पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. पहिल्या पावसात पाणी तुंबतंच. त्यामुळे पहिल्या शनिवारी काही प्रमाणात तुंबलेल्या पाण्याचं आम्ही समर्थन करू.



परंतु त्यानंतर गुरुवारी आणि शनिवारी पडलेल्या पावसामुळे जे पाणी तुंबलं त्यामुळे महापालिकेचं पितळ उघडं पडलं. त्यामुळे जर पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर मग भविष्यात पडणाऱ्या मुसळधार पावसात मुंबईचं काय होईल, अशी भीती राखी जाधव यांनी व्यक्त केली. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केली.


अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

पावसाचं आणि तुंबणाऱ्या पाण्याचं आम्हाला राजकारण करायचं नाही. तर प्रशासनाकडून योग्यप्रकारे काम करून घेऊन मुंबईकरांना दिलासा द्यायचा आहे. त्यामुळे ज्या ज्या भागात पाणी तुंबतं त्या त्या भागासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केल्यास कामे अधिक कार्यक्षम पद्धतीने होतील, त्यामुळे संबंधित भागात पाणी तुंबणार नाही. जर पाणी तुंबलंच तर ती त्या अधिकाऱ्याची जबाबदारी राहील, असं त्यांनी म्हटलं.



हेही वाचा-

मुंबईचा विकास आराखडा रद्द करा, शिवसेनेची मागणी

६ वर्षांत मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा होणार मोकळी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा