SHARE

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) या इंधन कंपनीमधील सरकारी हिस्सा विकत घेण्यासाठी सौदी अरामको ही कंपनी उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे. अरामको ही सौदी अरेबियाची सरकारी इंधन कंपनी आहे. बीपीसीएलमधील हा हिस्सा विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रीज असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर आता या स्पर्धेत सौदी अरामकोचे नाव पुढे आलं आहे.

हिश्श्याची विक्री करता

बीपीसीएलमधील सरकारी हिश्श्याची विक्री करता यावी यासाठी केंद्र सरकारनं आवश्यक नियमदुरुस्ती केली आहे. यामुळं या कंपनीतील ५३.२९ टक्के हिस्सा विकणे सरकारला शक्य होणार आहे. यातून केंद्र सरकारला १.०५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरामकोला भारतीय बाजारपेठेमध्ये अतिशय स्वारस्य असून, रिलायन्स इंडस्ट्रीसोबतच्या प्रस्तावित भागीदारीव्यतिरिक्त बीपीसीएलमधील सरकारी हिस्सा विकत घेण्याचा प्रस्तावही त्यांच्या विचाराधी असल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा -

दिवाळाचा फराळ यंदा महागणार, डाळींच्या किंमतीत वाढ

वर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूचसंबंधित विषय
ताज्या बातम्या