Advertisement

वर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच


वर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच
SHARES

अकरावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रवेशासाठी मोठी गर्दी  केली होती. त्यावेळीप्रवेश प्रक्रियेत प्रवेश न मिळालेले, काही कारणास्तव प्रवेश घेता न आलेले विद्यार्थी, एटीकेटी असलेले विद्यार्थी, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रवेशाची खात्री नसल्यानं जवळपास शेकडो विद्यार्थ्यांचं वर्ष फुकट जाण्याची शक्यता होती. मात्र, शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या विशेष फेरी राबवण्याच्या निर्णयानं विद्यार्थ्यी व पालकांना मोठी दिलासा मिळाला.

अनेक समस्या

अर्ज भरताना झालेल्या तांत्रिक चुका, घरात निर्माण झालेल्या समस्या, आजारी असल्यानं प्रवेश घेता आला नाही, अर्ज भरलाच नाही, एटीकेटी, फेरपरीक्षेनंतर पसंतीचं कॉलेज मिळालं नाही, अशा विविध कारणांनी अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुऴं विद्यार्थ्यांच्या या समस्या लक्षात घेत कार्यालयानं १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून शिक्षण उपसंचालकांच्या चर्नीरोड येथील कार्यालयात विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रवेशासाठी झालेल्या गर्दीमुळं ११० विद्यार्थ्यांना कार्यालयाकडून टोकन देण्यात आलं. तसंच, दुपारनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी येण्यास सांगितलं आहे.


प्रवेश अर्ज

प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जही भरले नव्हते. तर अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळं प्रवेश घेता आला नव्हता. त्यामुळं ज्यांनी अर्ज भरला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशपुस्तिका देऊन त्यांचे अर्ज भरून त्यांना व प्रक्रियेदरम्यान प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं तपासून त्यांना ऑनलाइन पद्धतीनं कार्यालयाकडून जागीच प्रवेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण

मनसे समर्थकांचं अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा