मनसे समर्थकांचं अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट असं उत्तर दिलं होतं. याच टिकेवरून मनसे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी अमृता ताईंना याचं प्रत्युत्तर दिलं आहे.

SHARE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ताईंचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलेला टोला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट असं उत्तर दिलं होतं. याच टिकेवरून मनसे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी अमृताताईंना याचं प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे समर्थकांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंवर केलेल्या टिकेला उत्तर देत मनसे समर्थकांनी अमृता फडणवीस यांना 'मामूची मामी, करमणुकीची नाही कमी' असं म्हटलं आहे. फक्त एवढ्यावरच न थांबता त्यांचा मुंबई-गोवा क्रुझवरील एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. या व्हिडिओला त्यांनी 'मामूची मामी, करमणुकीची नाही कमी’, हा हॅशटॅग वापरला आहे.


कुठला व्हिडिओ?

गेल्या वर्षी २० ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरू करण्यात आली होती. अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला होता. यावरूनच नंतर बराच वाद झाला होता. सेल्फी घेण्याचा हाच व्हिडिओ मनसेच्या समर्थकांनी पोस्ट केला आहे.  हेही वाचा

मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडे

राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत

संबंधित विषय
ताज्या बातम्या