Advertisement

प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण


प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण
SHARES

मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतली असून मान्सूननंही मुंबईला बाय-बाय केला आहे. मात्र, पावसाच्या विश्रांतीनंतर वाढलेल्या तापमानामुळं विशेष ऑक्टोबर हीटमुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईमध्ये मंगळवारी कमाल तापमानाच्या पाऱ्यानं ३६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याचं समजतं. सांताक्रूझ इथं ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कुलाबा इथं ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

कमाल तापमान

सांताक्रूझ इथं कमाल तापमानाचा पारा सरासरीहून ३.२ अंश जास्त होता तर कुलाबा इथं हे तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंशांनी जास्त होते. मुंबईचं मंगळवारचं तापमान ऑक्टोबरमधील यंदाचं सर्वाधिक तापमान असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं पुढील काही दिवस तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

तापमान अधिक

कोकण विभागासह अलिबागमधील तापमान मंगळवारी अधिक होतं. अलिबागमध्ये कमाल तापमानाचा पारा ४.३ अंश सेल्सिअसनं चढला होता. तर रत्नागिरी इथं सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी कमाल तापमान अधिक होतं.हेही वाचा -

१४ बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुंबईच्या बंडखोरांचा समावेश नाही

PMC बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यूसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा