मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी

शनिवारी सकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास मुंबईतील दादर, वडाळा, परळ यांसारख्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवस मुंबईत ढगाळ वातावरण चित्र दिसतं आहे.

SHARE

मुंबईसह उपनगरातील रहिवासी दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळं प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र, शनिवारी सकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास मुंबईतील दादर, वडाळा, परळ यांसारख्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवस मुंबईत ढगाळ वातावरण चित्र दिसतं आहे. त्यामुळं मुबईकरांना लवकरच पाऊस दाखल होईल, अशी आशा आहे.


मान्सून दाखल

भारतीय हवामान विभागानं यंदा केरळमध्ये मान्सून ८ जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तसंच, पुढील काहीच दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

दरवर्षी श्रीलंकेत मान्सून मे महिन्यात दाखल होतो. मात्र यंदा ८ ते १० दिवसांनी उशीरा दाखल झाला आहे. त्यामुळं यंदा मान्सून केरळात देखील उशीरा दाखल झाला असून, महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल होण्यास उशीर होणार आहे.हेही वाचा -

दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला

एसी लोकलसाठी उभारणार २ नवे रेल्वे कारशेड, रेल्वे अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या