Advertisement

बिरादरांची जी नॉर्थच्या सहायक आयुक्तपदावरून बदली; राजकारणाचा संशय


बिरादरांची जी नॉर्थच्या सहायक आयुक्तपदावरून बदली; राजकारणाचा संशय
SHARES

मुंबईतील विभागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू असतानाच आता दादर-माहीममधील जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांची बदली करण्यात आली आहे. बिरादर यांच्या जागी परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक खैरनार यांची प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या बदलीमागे मोठे राजकारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आयुक्तांनी काढली बदलीची ऑर्डर

महापालिकेतील एक सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांना बढती, तर एका कार्यकारी अभियंत्याची घर वापसीची ऑर्डर मंगळवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काढली. बोरीवलीतील आर मध्य विभागाचे सहायक आयुक्त अतुल राव यांना पुन्हा आपल्या स्वगृही पाठवले आहे. राव यांना पुन्हा नगर अभियंता खात्यात पाठवताना त्यांच्या जागी दादर-माहीममधील जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


पडद्यामागच्या हालचाली...

बोरिवलीच्या आर/ मध्य विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त किशोर गांधी यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी अतुल राव यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तत्कालीन नागरसेवकांनी याला तीव्र विरोध केल्यानंतर या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. नंतर गांधी यांची बदली मुलुंड टी वॉर्डला करून अतुल राव यांना सहायक आयुक्त बनवले होते. परंतु, अतुल राव हे या पदाची जबाबदारी समर्थपणे पेलू न शकल्याने त्यांची बदली करून पुन्हा अभियंता खात्यात पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.


कीर्तिकर मार्केटमधल्या कारवाईचा बदला?

राव यांना परत त्या खात्याकडे पाठवताना परिवहन विभागातील शहर भागाचे कार्यकारी अभियंता अशोक खैरनार यांना जी/ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिरादर यांनी दोनच दिवसांपूर्वी दादर कीर्तिकर मार्केटमध्ये मोठी कारवाई केली होती. या कारवाईचा फटका त्यांना बसल्याची चर्चा आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा