Advertisement

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील

कमला मिलमधील वन अबव्ह व मोजोस या पबमधील आगीच्या दुघर्टनेनंतर दुसऱ्याच दिवशी लोअर परळमधील सर्वच पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट बारची तपासणी करतानाच मुंबईतील सर्वच भागातील सहायक आयुक्तांना यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच संपूर्ण मुंबईत ही मोहीम हाती घेण्यात आली.

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील
SHARES

कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच पब, रेस्टॉरंट बार, मॉल आणि क्लब याची तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल ३१४ पब, रेस्टॉरंट बार तसेच क्लबवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये ७ हॉटेल, पबचे बांधकाम सील करण्यात आले आहे.


दिवसभर आणि शहरभर कारवाई!

कमला मिलमधील वन अबव्ह व मोजोस या पबमधील आगीच्या दुघर्टनेनंतर दुसऱ्याच दिवशी लोअर परळमधील सर्वच पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट बारची तपासणी करतानाच मुंबईतील सर्वच भागातील सहायक आयुक्तांना यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच संपूर्ण मुंबईत ही मोहीम हाती घेण्यात आली.

कमला मिलमधील सर्व पब आणि रेस्टॉरंट बारवर कारवाई करतानाच रघुवंशी मिल, तोडी कंपाऊंड, मातुल्य मिलमधील पब, बारची तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. लोअर परळ येथील स्मॅशवरही कारवाई करण्यात आली.


बड्या जिमखान्यांवरही कारवाईचा बडगा

याशिवाय सर्व बड्या पब आणि रेस्टॉरंट बारसह जिमखान्यांचीही तपासणी करून त्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये शिवाजीपार्क जिमखाना, पारशी जिमखाना, इस्लाम जिमखाना, विल्सन आदींवर कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईतील २४ विभाग कार्यालयांमये ६२४ पब, रेस्टॉरंट बार आणि जिमखाना आदींची तपासणी करण्यात आली. यापैकी ३१४मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचे आढळून आल्याने त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सरासरी १००० चौरस फुटांच्या वाढीव अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले आहे. या सर्व कारवाईत ४१७ सिलेंडर्स जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


सात पब, बार, रेस्टॉरंट्सना सील

यापूर्वी कारवाई करण्यात आल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी त्या जागेचा वापर झाल्याचे आढळून आल्यामुळे, तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्यामुळे तब्बल ७ पब, रेस्टॉरंट बारना सील ठोकण्यात आले आहे. यामध्ये चेंबुरमधील फ्लेमिंगो आणि सोई या हॉटेलचा समावेश आहे. तर मालाडमध्येही एक हॉटेल सील केले आहे.


या हॉटेल, पब, मॉलवर करण्यात आली कारवाई:

कुलाबा, नरिमन पॉईंट - ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - पारशी जिमखाना, विल्सन, कॅथोलिक व इस्लाम जिमखाना, काळा घोडा जवळील खैबर हॉटेल, दादाभाई नौरोजी मार्गावरील जाफरान हॉटेल, मर्जबान मार्गावरील बरिस्ता हॉटेल

के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - पेनिन्सुला हॉटेल, लेडी बागा, हक से, दि फॅटी बोई, डिओएच, ग्रँट मा कॅफे, मिल्क, तप्पा, क्षिको, पीओएच, कोदे, प्रवास, स्मॅश

एन विभाग घाटकोपर महापालिका विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखालील कारवाई - निलयोग मॉल, संतोष बार आणि रेस्टॉरंट

वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम - एच-पश्चिमचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - जंक यार्ड, हिल रेड, न्यूयॉर्क चॅपल रोड, केएफसी मॉल, झेन शॉपिंग सेंटर, यू टर्न, बॉम्बे अड्डा, रेडियो बार, ओन्ली पराठा

अंधेरी पश्चिमच्या के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेली कारवाई - शिशा स्काय लॉज, जुहू वूडलँड हॉटेल, कब अँड क्रिस्टल पॉईंट, टेक ईट इझी, आर सिटी मॉल, टॅप रेस्टॉरंट

गोरेगाव पी-साऊथ विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्या नेत्वाखाली झालेली कारवाई - सुप्रिम स्पाईस, एवरशाईन मॉल, गोल्डन गेट फिल्मसिटी, हॉटेल ओझोन, सबकुछ हॉटेल, एमटी ६४, पिकासो

मालाड पी-दक्षिण विभागाच्या विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्या नेत्वाखाली झालेली कारवाई - लिंक रोड, मालाड मालवणी मराठा मंदिर

कुर्ला एल विभागाच्या सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली झालेली कारवाई - पेनीन्सुला हॉटेल, हॉटेल चॉईस ली (वीज व पाणीपुरवठा तोडला), हॉटेल मेग्रुस्सा

भांडुप एस विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली कारवाई - सागर हॉटेल, पवई, मिनी पंजाब लेक साईड, ३८ ईस्ट

ग्रँटरोड डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई- शालिमार हॉटेल

लोअरपरळ, वरळी - जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - कमला मिलमधील लेडी बागा, हक से, द फॅटिबो, डीआरएच, ग्रँड मा कॅफे, मिल्क, झायको, टप्पा, पीओएच, कोड, प्रवास, स्मॅश, रघुवंशी मिलमधील अनेक अनधिकृत बांधकामे, अॅट्रिया मॉलमधील उपहारगृह इत्यादी

लालबाग, परेल - एफ-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - अयप्पा इडली सेंटर, आर्यभवन, माया स्वीट, गुरुनानक स्वीट, केरळा हॉटेल

दादर, माहीम विभागाच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - शिवाजीपार्क जिमखाना

चेंबुर एम-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - फ्लेमिंगो, सोई

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व - एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - ग्रँट हयात, ट्राईडंट, सोफिटेल, एमसीएस, एमआयजी

दहिसर आर-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कारवाई - पेंट हाऊस, व्ही मॉल, जैमिज ढाबा, सरोवर, रामाज, निर्वाणा



हेही वाचा

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा