Advertisement

कमला मिल आगीनंतर महापालिकेला जाग, अनधिकृत बांधकामांवर शहरभर बडगा


कमला मिल आगीनंतर महापालिकेला जाग, अनधिकृत बांधकामांवर शहरभर बडगा
SHARES

कमला मिल कम्पाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर बीएमसीला अखेर जाग आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं या परिसरात बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनं लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला.



वरळी आणि लोअर परेलमधील स्कायव्ह्यू कॅफे, फ्लिप अॅट एमटीव्ही कॅफे आणि सोशल या रेस्टॉरंट्सनी मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल करून बेकायदा बांधकाम केलं होतं. ही बांधकामं पाडण्यात आली आहेत. शिवाय वरळीच्या रघुवंशी मिल मिल कम्पाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेड्स पाडण्यात आल्या आहेत.



कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाऊस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर पालिकेकडून धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. ही कारवाई शनिवारी पूर्ण दिवस सुरू असणार आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करणण्यात आलं आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा