SHARE

नोटबंदीत विस्कळीत झालेली राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा आजही तशीच आहे़. रविवारी मुंबईतील कुलाबा, चर्चगेट स्टेशन परिसरातील एटीएममध्ये खडखडाट होता़. शुक्रवारी ग्रुडफायडे त्यानंतर मागोमाग शनिवार रविवारची सुट्टी आल्यामुळे एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवला. त्यामुळे रविवारी शॉपिंगला निघालेल्या नागरिकांची एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे गैरसोय झाली.

अनेक नागरिक उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे गावाकडे जाण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे रविवार हा सुटीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक साहित्याची खरेदी करण्याकडे घराबाहेर पडले. रोख रक्कम घेऊन फिरण्याऐवजी एटीएम मशीनद्वारे पैसे काढता येत असल्याने नागरिक एटीएमकडे वळले. मात्र बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांना पैसे असलेल्या एटीएमच्या शोधासाठी पायपीट करावी लागली. सुटीच्याच दिवशी एटीएम मशीनमध्ये खडखडाट असल्याचे दुर्देवी चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे रविवारची सुटी असो किंवा सण-वाराची सुटी असो, या दिवशी एटीएम मशीनमधून पैसे मिळणे म्हणजे नशिबच, अशी प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या