बाबा सिद्दीक गोळीबार प्रकरणी शुभम लोणकरचा 28 वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यात अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सहभागी करणाऱ्यांपैकी तो एक आहे. पुढील तपास सुरू असून वाँटेड आरोपी मोहम्मद झीशान अख्तर याचा शोध सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी यांच्या ऑफिस आणि पाली हिल येथील घरावर अनेकदा रेकी केली होती. वाँटेड आरोपी शिवकुमार गौतम आणि अटक करण्यात आलेला धर्मराज कश्यप हे दोघेही पुण्यातील एका भंगार विक्रेत्याकडे कामाला होते. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आले ज्याने त्यांना मुंबईला जाण्याची सूचना केली आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येचा करार केला.
त्यानंतर, शिवकुमार आणि कश्यप सप्टेंबरमध्ये कुर्ला येथे भाड्याच्या घरात राहायला गेले. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर तीन महिन्यांचा भाडे करार करण्यात आला होता. ज्याचे मासिक भाडे सुमारे 5,000-6,000 होते. शिवकुमार, गुरमेल, झीशान आणि कश्यप यांना 2 लाखांचे हप्ते मिळाले होते, पोलिस तपासात उघड झाले आहे.
बाबा सिद्दीकीवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट ‘शुब्बू लोणकर महाराष्ट्र’ या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली होती.शुभमला जानेवारी 2024 मध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शुभमच्या भावालाही अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आरोपींनी भाड्याच्या खोलीत ड्राय फायरिंगचा सराव केला. गुरमेल, शिवकुमार आणि कश्यप यांनी कुर्ला ते वांद्रे खेर नगर असा ऑटो-रिक्षाने प्रवास केला. रात्री 9 च्या सुमारास बाबा सिद्दीक खेर नगर येथील झीशान सिद्दीकीच्या कार्यालयात गेले, सुमारे 20 मिनिटे थांबले आणि नंतर तेथून निघून गेले. बाबा सिद्दीकी त्यांच्या पार्क केलेल्या कारकडे जात असताना शिवकुमारने त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्याच्यासोबत असलेले गुरमेल आणि कश्यप यांना पोलिसांनी पकडले. गुरमेल हा मूळचा हरियाणाचा आहे.
हरियाणाच्या कैथल तुरुंगात गुरमेल आणि जीशान अख्तर यांची भेट झाली. झीशान आणि गुरमेल हे दोघेही हरियाणाचे आहेत, तर शिवकुमार आणि कश्यप हे उत्तर प्रदेशातील बहराइचचे आहेत. या चौघांनाही एकत्र आणणारा पाचवा व्यक्ती असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्यांना बाबा सिद्धिकीचे फोटो आणि व्हिडिओ ओळखण्यासाठी देण्यात आले होते. सप्टेंबरपूर्वी हा कट रचण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा