Advertisement

पद्मभूषण जगजित सिंग चौकाचे उद्घाटन


पद्मभूषण जगजित सिंग चौकाचे उद्घाटन
SHARES

वांद्रे - प्रसिद्ध गझलगायक जगजित सिंग यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी वांद्रे रेक्लेमेशनच्या समुद्र सेतू कार्यालयासमोर असलेल्या चौकाचे 'पद्मभूषण जगजित सिंग चौक' असे नामकरण झाले. याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, जगजीत सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग, स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया, अरमान चौधरी, नामनिर्देशित नगरसेवक अॅड मेहराज शेख आणि एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांची उपस्थिती होती. 

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा