Advertisement

'पी ३०५' दुर्घटनेतील 'इतक्या' मृतदेहांची ओळख पटवण्यात यश

मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका नौदलाला चांगलाच फटका बसला. या वादळात 'पी ३०५' तराफा आणि 'वरप्रदा' या २ नौकांना जलसमाधी मिळाली.

'पी ३०५' दुर्घटनेतील 'इतक्या' मृतदेहांची ओळख पटवण्यात यश
SHARES

मुंबईत (mumbai) आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका नौदलाला चांगलाच फटका बसला. या वादळात 'पी ३०५' तराफा आणि 'वरप्रदा' या २ नौकांना जलसमाधी मिळाली. यामध्ये अनेकांनी आपला जीवही गमवला असून, आतापर्यंत सुमारे ५५ मृतदेहांची ओळख पटल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, १३ मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही बाकी असून पालघर नजीक आणखी एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही.

तौक्ते चक्रीवादळात जलसमाधी मिळालेल्या ‘पी ३०५’ तराफा आणि ‘वरप्रदा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम मंगळवारीही सुरू होते. आतापर्यंत सुमारे ५५ मृतदेहांची ओळख पटली असून ५२ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, रायगड आणि गुजरात किनाऱ्यावर सापडलेल्या १३ मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही बाकी असून पालघर नजीक आणखी एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही.

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘पी ३०५’ तराफा आणि ‘वरप्रदा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी नौदलाने मोहीम राबविली होती. सोमवारी ही मोहीम संपुष्टात आली. या शोध मोहिमेत ७० मृतदेह सापडले होते. तर रायगडच्या किनाऱ्यावर ८, गुजरातमधील वलसाडजवळ ७, दीव दमणच्या किनाऱ्यावर १ आणि पालघरनजीक १ मृतदेह सापडले आहेत. त्यातील वलसाड येथील २ आणि दीव दमणच्या किनाऱ्यावरील मृतदेहांची ओळख पटली असून अन्य १४ मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत ५५ मृतदेहांची ओळख पटली असून, अजून अन्य मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. समुद्रातील पाण्यात राहिल्याने अनेक मृतदेह कुजलेले आहेत. त्यांची ओळख पटवणं अवघड असल्यामुळं डीएनएन चाचणीआधारे मृतांची ओळख पटवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Cyclone Tauktae: दुर्दैवी! समुद्रात बुडालेल्या बार्जवरील १४ जणांचे मृतदेह हाती, तर १८४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा