बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प

  Pali Hill
  बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प
  मुंबई  -  

  मुंबई – वीज ग्राहक आणि प्रवाशांना सोयी सुविधांची आश्वासने देणारा बेस्टचा 2017-18 साठीचा सुमारे 6551 कोटीचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीच्या सभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानुसार बेस्टचे उत्पन्न 5185.84 कोटी इतके असून, 565.74 कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प तुटीचा असला तरी बेस्ट प्रवाशी आणि वीज ग्राहकांच्या फायद्याच्या अनेक तरतुदींनी भरलेला असा हा अर्थसंकल्प असल्याचा दावा बेस्टकडून करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आणि तरतुदी पुढीलप्रमाणे.

  अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

  • 6 हजार 551 कोटी रुपयांचा एकूण अर्थसंकल्प
  • 565.74 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प
  • विद्युत पुरवठा विभागाच्या 550 उपकेंद्रांमध्ये स्वयंचलित वितरण प्रणाली प्रस्तावित
  • 2017-18 मध्ये 550 पैकी 183 उपकेंद्र आणि दादर येथील नियंत्रण कक्षात स्वयंचलित वितरण प्रणाली
  • एका आगाराच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी
  • तीन वर्षांत आगाराचा पुर्नविकास करायचा असल्यास 100 कोटीची रक्कम तीन टप्प्यात
  • डबलडेकर बसगाड्यांमधील आसन व्यवस्थेत बदल होणारा
  • बस चौक्यांमध्ये आणि रोख भरणा केंद्रात ई-प्रसाधनगृह बसवण्याचेही प्रस्तावित
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.