Advertisement

'मुंबई लाइव्ह'ची २०२० मधील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रे

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी निराशाजनक गेलं आहे. मात्र, या निराशेतही काही व्यंगचित्रांनी हसण्यास मदत केली. व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून रेखाटलेली अशीच काही 'मुंबई लाइव्ह'मधील या वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रं शेअर करीत आहोत.

'मुंबई लाइव्ह'ची २०२० मधील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रे
SHARES

अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं. अर्जेंटिनाला विश्वचषक मिळवून देणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.


पहिल्यांदा विश्वचषक जिंकणाऱ्या कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांनी ट्विट करत आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली.तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. लवकर बरा होईन असं म्हणत कपिल देव यांनी सर्वांचे आभार मानले

आवाजाचा जादूगार प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी ११८ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेल्या PUBG अॅप्सचाही सहभाग आहे.

केरळमधील मलप्पुरम येथे एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके खायला घातल्याने या हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला. याचे पडसाद देशभर उमटले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा