Advertisement

ज्येष्ठांच्या बस प्रवासाचा भार महापालिकेच्या खांद्यावर


ज्येष्ठांच्या बस प्रवासाचा भार महापालिकेच्या खांद्यावर
SHARES

बेस्टच्या विनावातानुकूलीत बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता महापालिकेकडून तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. आतापर्यंत बेस्टकडून ज्येष्ठांना ही सवलत देण्यात येत होती. परंतु बेस्टची आर्थिक स्थिती लक्षात घेता खर्चाचा हा भार यापुढे महापालिकेने उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी महापालिकेने १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


मासिक खर्च देणार

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्याने प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलती बंद करण्याची शिफारस होत आहे. महापालिका आयुक्तांनी बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत देताना काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे. मात्र, सध्या बेस्टकडून ज्येष्ठांना सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी तिकीट दरातील ५० टक्के सवलतीचा खर्च महापालिका उचलणार आहे. यासाठी मासिक खर्चाची बिले बेस्टने महापालिकेला सादर केल्यास, त्याप्रमाणे ही बिले दिली जाणार असल्याचे नियोजन विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी नमूद केले आहे.


अंधांनाही मोफत प्रवास

मुंबईत दृष्टिहिन व ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अंध व्यक्तींना बेस्टच्या बसेसमधून सवलतीच्या दरात प्रवास प्रवास उपलब्ध करून दिला जात असे. परंतु आता अंधांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देत, त्यासाठी येणारा खर्च महापालिकेच्यावतीने बेस्टला दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने बेस्टला सुमारे ५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. जेंडर बजेटमध्ये या चालू आर्थिक वर्षात मोफत प्रवासासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या  निधीतून मागील वर्षी तरतूद केलेल्या निधीपेक्षा १ कोटी ७ लाख ५७ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. हा खर्च केलेला निधीतील रक्कम कमी करून उर्वरीत ४ कोटी ९२ लाख ४२ हजार रुपयांचा निधी बेस्टला अदा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगासाठी राखून ठेवलेल्या ३ टक्के निधी खर्च करण्याची मार्गदर्शक सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात गटनेत्यांच्या मान्यतेनुसार ६ कोटी रुपयांची तरतूद अंध व्यक्तींसाठी मोफत बेस्ट प्रवासासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.



हेही वाचा -

महिला बचत गटांना महापालिका देणार २५ हजार रुपये



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा