मुंबई - बेस्ट उपक्रमानं 2017-18 चा अर्थसंकल्प शुक्रवारी बेस्ट समितीमध्ये मंजूर केलाय. बेस्ट उपक्रमानं अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करत 590.74 कोटी तूटीचा अर्थसंकल्प मंजूर केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाड करण्यात आलेली नाही. बेस्ट उपक्रमात 565.74 कोटींची तूट आहे. मुळात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्पच मंजूर करावा असा नियम असताना बेस्टने खरी वस्तुस्थिती मांडणारा खराखुरा अर्थसंकल्प प्रशासनानं मांडला. समितीनं त्याला मंजूरी दिली. गेल्या दोन वर्षांत बेस्टला झालेला नफा गृहीत धरून कर्मचाऱ्यांसाठी बोनसची तरतूद करावी अशी उपसुचना शिवसेनेनं केली आणि या उपसुचनेसह कर्मचाऱ्यांसाठी बोनसची तरतूद करण्यात आलीय. महसूली आणि भांडवली खर्च मिळून 6551.58 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. टीडीएलआर गेल्यामुळे बेस्टच्या विद्युत विभागाला 1000 कोटींचा नफा झालाय.