बेस्टमध्ये पुऩ्हा होणार टिक् टिक!

 Mumbai
बेस्टमध्ये पुऩ्हा होणार टिक् टिक!

मुंबई : हातातील चिमट्याची टिक टिक करत, तिकीट, तिकीट असे बोलत पत्र्याच्या पेटीतून तिकिटे विकणारे कंडक्टर बेस्टच्या बसमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहेत. सध्या प्रवाशांना छापील तिकिटांची सुविधा पुरवणा-या ट्रायमॅक्स कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. या काळात वाहकांनी प्रवाशांना जुन्या पद्धतीनं पत्र्याच्या पेटीत तिकिटांचे गठ्ठे ठेवून तिकिटे द्यावीत, असं बेस्ट समिती सदस्यांनी सूचवलंय. ही पद्धत नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाच्या वाहकांच्या हाती पुन्हा एकदा छापील तिकीट आणि ती तिकिटे प्रवाशांना पंच करून देणारा चिमटा येणार आहे. त्यामुळं पुढचा काही काळ प्रवाशांना बेस्टमध्ये चिमट्याची टिकटिक ऐकण्याची संधी मिळणार आहे. 

 

Loading Comments