Advertisement

१ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल


१ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल
SHARES

बेस्ट उपक्रमाने नुकत्याच मंजुरी दिलेल्या अर्थसंकल्पात बेस्ट गाड्यांच्या मार्गात आणि फेऱ्यांच्या विस्तारात बरेच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल १ डिसेंबरपासून करण्यात येणार आहेत. बेस्ट प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल जाणून घेऊया.


अतिरिक्त फेऱ्या कुठे?

 • भायखळा ते प्रतिक्षनगर बसमार्गावर १७२ क्रमांकाची बस चालवण्यात येते. या मार्गावर वीर कोतवाल उद्यान ते प्रतिक्षानगर दरम्यान अतिरीक्त बसफेऱ्या चालवल्या जातील.
 • बोरिवली स्थानक पूर्व ते कोकणीपाडा बसमार्गावर २९७ क्रमांकाची बस चालवण्यात येते. या मार्गावर बोरिवली स्थानक पूर्व ते मिनीनगर दरम्यान अतिरीक्त फेऱ्या चालवल्या जातील.
 • प्रतिक्षानगर ते सीप्झ या ३१२ क्रमांकाच्या बसमार्गावर प्रतिक्षानगर ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान अतिरीक्त फेऱ्या वाढवण्यात येतील.
 • महाकाली गुंफा ते आगरकर चौक, अंधेरी या ३३३ क्रमांकाच्या बसमार्गावरही अतिरीक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.


बसफेऱ्यांत विस्तार कुठे?

 • बस मार्ग क्र. २२० - आधी वांद्रे बसस्थानक आणि खार बसस्थान ते शेर्लीगाव दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बसमार्गात विस्तार करण्यात आहे. यापुढे ही बस वांद्रे बसस्थानक ते वांद्रे रिक्लॅमेशनपर्यंत चालवण्यात येईल.
 • तर खार बस्थानक ते सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय इथपर्यंत अतिरीक्त बसगाड्या चालवण्यात येतील.
 • बसमार्ग क्र. ३०३ - वांद्रे बसस्थानक आणि म्हाडा बसस्थानक दरम्यान चालवण्यात येणारा बसमार्ग वांद्रे बसस्थानक पूर्व येथून वांद्रे टर्मिनसपर्यंत विस्तारीत करण्यात येणार आहे.
 • बसमार्ग क्र. ३१८- कुर्ला स्थानक (प) आणि सांताक्रूझ पूर्व दरम्यान सुरू असलेल्या बसमार्गावर सांताक्रूझ पूर्व व अमर ब्रीस स्टील दरम्यान अतिरीक्त बसफेऱ्या चालविण्यात येतील. तसेच या मार्गाचा विस्तार कुर्ला आगारापर्यंत करण्यात आला आहे.


सुरूवातीच्या स्थानात बदल

 • बसमार्ग क्र. ९- कुलाबा बसस्थानक ते नाडकर्णी उद्यान दरम्यान चालणारी बस आता अॅन्टॉप हील येथे समाप्त होईल. तर अॅन्टॉप हील व नाडकर्णी दरम्यान शेख मेसरी मार्गावर चालविण्यात येणारी अतिरिक्त सेवा रद्द करण्यात आली आहे.
 • बसमार्ग क्र. ४४- ही बस कुलाबा आगार ते वरळी गांव दरम्यान चालवण्यात येणारी सेवा आता डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते वरळी आगार दरम्यान चालवण्यात येईल.
 • बसमार्ग क्र. ४५- मंत्रालय ते एमएमआरडीए वसाहत दरम्यान चालणारा हा बसमार्ग माहुलपर्यंत विस्तारीत होईल.
 • बसमार्ग क्र. ६२- मुंबई सेंट्रल आगार आणि विद्याविहार बसस्थानक दरम्यान चालणारा बसमार्ग आता वीर कोतवाल येथे समाप्त करण्यात आला आहे.
 • बसमार्ग क्र. ३०२- प्रतिक्षा नगर डेपो ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) दरम्यान चालणारा बसमार्ग आता राणी लक्ष्मीबाई चौक(सायन) ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) असा असेल.
 • बसमार्ग क्र. ४९७ (लि.)- घाटकोपर बस स्थानकपासून सुरू होणारा हा बसमार्ग आता मुलुंड स्थानक ते लोकमान्य नगर (ठाणे) असा असेल.
 • बसमार्ग क्र. ५३३ (लि.)- अंधेरी स्थानक (प) ते वाशी सेक्टर क्र. १९ मार्गावर धावणारी बस केवळ रविवारीच उपलब्ध होईल.


'या' मार्गांचं विलिनीकरण

 • बसमार्ग क्र. १८२ या बसमार्गाचं १८० या बसमार्गात विलिनिकरण करण्यात आलं आहे. हा बसमार्ग राणी लक्ष्मीबाई चौक (सायन) ते मालवणी डेपो (पू) असा असेल.
 • बसमार्ग क्र. ४३३ हा बसमार्ग बसमार्ग क्र. ३२२ मध्ये विलिन होईल. हा बसमार्ग विद्याविहार बस स्थानक ते महंत रोड, परळ (पू) असा असेल.
Read this story in English
संबंधित विषय