SHARE

घाटकोपर - सध्या भटक्या कुत्र्यांनी घाटकोपर विभागात हैदोस घातला आहे. गेल्या मार्च महिन्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात 1 हजार 88 रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे.

गंगावाडी, भटवाडी, काजूटेकडी, पारशीवाडी, भिमनगर, पार्कसाइट, भाजी मार्केट, एम.जी. रोड, स्टेशन रोड, पटेल चौक, जैन मंदिर, 7 नं. रोड आणि पंतनगर घाटकोपर पूर्व-पश्चिम या दोन्ही ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठा त्रास होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केला आहे.

वरील सर्व परिसरात पिसाळलेली आणि भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात आहेत. पालिका आरोग्य विभाग या भटक्या कुत्र्यांना पकडून लसीकरण करत नाही. तसेच रस्त्यावर भटकी कुत्रे दिसून येतात. पण, राजावाडी रुग्णालयाच्या आवारात देखील भटकी कुत्रे आढळतात. या भटक्या कुत्र्यांमुळे रुग्णांना आणि रुगणालयातील परिचारीकांना देखील या कुत्र्यांचा त्रास होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे राजावाडी रुग्णालयातील दक्षता समितीचे सदस्य प्रकाश वाणी यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या