मुंबईत 'दरवाजा बंद' अभियानाचा शुभारंभ

Churchgate
 मुंबईत 'दरवाजा बंद' अभियानाचा शुभारंभ
 मुंबईत 'दरवाजा बंद' अभियानाचा शुभारंभ
See all
मुंबई  -  

2018 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे, जिल्हे हगणदारीमुक्त करणार असून, पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर आणि महानायक सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मंगळवारी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 'दरवाजा बंद' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतीने हगणदारीमुक्त झालेल्या 11 जिल्ह्यांचा आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'दरवाजा बंद' अभियानाअंतर्गत जे उघड्यावर शौच करतात त्यांच्यामध्ये या अभियानातून जनजागृती करण्यात आली असून, शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

राज्यातील 149 तालुके, 16 हजार 581 ग्रामपंचायती, 23 हजार 844 गावे हगणदारी मुक्त झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 2016-17 दरम्यान राज्यात 19 लाख 17 हजार 670 शौचालये बांधण्यात आली आहेत. 'मी जिल्ह्याचा दौरा करत असताना एकवेळ त्या जिल्ह्यातील रस्ते पाहत नाही, मात्र तेथील शौचालयांची आवर्जून पाहणी करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. या अभियानाविषयी चर्चा करताना 'दरवाजा बंद' नावाला अनेकांनी विरोध दर्शवला. मात्र ज्या जिल्ह्यांना हगणदारीमुक्त अभियान पुरस्कार मिळाला त्यांच्याविषयी आदर वाटतो असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.