Advertisement

लॉकडाऊनची जाणीव, मात्र तरिही गर्दी कशाला हवी?

देश जरी लॉकडाऊन करण्यात आला असला तरी, यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं होतं. याची जाणीव असतानाही लोकांनी गर्दी केली.

लॉकडाऊनची जाणीव, मात्र तरिही गर्दी कशाला हवी?
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळं नागरिकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कारण कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत अनेक घोषणा केली. यावेळी मोदी यांनी कोरोनाची लागण झालेल्यांची वाढलेली संख्या पाहता २१ दिवस संपुर्ण दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर सामान्यांनी तातडीनं किराण सामान भरण्यासाठी मोठी गर्दी केली. लॉकडाऊन म्हणजे सर्व बंद होणार या भीतीनं नागरिकांनी गर्दी केली. परंतु, देश जरी लॉकडाऊन करण्यात आला असला तरी, यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं होतं. याची जाणीव असतानाही लोकांनी गर्दी केली.

नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर मुंबईतील किराणा मालाची दुकानं, खाद्यपदार्थांची दुकानं आणि किराणा उपलब्ध असलेल्या सुपरशॉपींमध्ये मोठी गर्दी पहायला मिळत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट असला तरी, किराणा मालासाठी नागरिकांची गर्दी पाहता बहुतेक यांना कोरोना व्हायरसचं गांभिर्य नसल्याचं कळतं. नियमीतपणे घराबाहेर जाऊन काही लोक खरेदी करत आहेत. काही दिवस घरीच बसून राहण्याची शक्यता निर्माण झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. 

भाजीपाला, दूध, कडधान्ये, धान्ये आणि खाद्यपदार्थांचा साठा करून घेण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. सुपरशॉपीमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना टप्प्याटप्प्यानं आत सोडलं जात होतं. आधीचे ग्राहक बाहेर पडल्यानंतरच पुढील ग्राहकांना प्रवेश देण्यात येत होता. अचानक खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्यानं दुकानदारांकडील साठा संपत आल्याचं चित्र दिसून आलं. 

गुरुवारी रस्त्यावर शुकशुकाट असला, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये मात्र गर्दी कायम होती. एकीकडे गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात असताना दुसरीकडं जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक तुडुंब गर्दी करीत होते. त्यामुळं 'कोरोना'चा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचीच खरेदी केली जात असल्यामुळं किराणा व्यापाऱ्यांचा धंदा काही प्रमाणात तेजीत आला असला, तरी आता माल कमी पडत असल्यानं अनेक ठिकाणी अडचणीही निर्माण झाल्या आहेत.

त्याशिवाय, मांसाहार केल्यानं करोनाचा संसर्ग होतो अशी अफवा पसरल्यानं मांसाहार करण्याचं प्रमाण घटलं आहे. त्या ऐवजी नागरिकांनी ताज्या भाज्या खाण्यावर भर दिला आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांच्या व्यापारात वाढ झाली आहे. मुंबईसह उपनगरातील हॉटेल्सही बंद असल्यानं भाज्यांची मागणीत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा