Advertisement

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प

राज्यात रक्तदानाचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीनं रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प
SHARES

राज्यात रक्तदानाचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीनं रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदानाबाबत आवाहन केलं होतं. त्यानुसार, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीनं रक्त संकलन करण्याचा संकल्प  करण्यात आला आहे.

मुंबईतील रहिवाशांना रक्तदान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपलं नावं श्री सिद्धिविनायक गणपती  मंदीरात दुरध्वनीद्वारे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नोंदवावे. येत्या १ एप्रिल पासून ही रक्तदान योजना सुरु होणार असून ०२२- २४२२४४३८ किंवा ०२२- २४२२३२०६ या नंबरवर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक न्यासशी संपर्क साधावा.

रक्तदात्याच्या राहत्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल. त्यामुळे रक्तदात्याना राहत्या ठिकाणी रक्तदान करता येणार आहे. त्याशिवाय, गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावं आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलं आहे.



हेही वाचा -

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ

Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा