Advertisement

ऑगस्टपासून नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी

महापालिका कर्मचाऱ्यांनंतर आता नगरसेवकांचीही हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं नोंदवली जाणार आहे. नगरसेवकांना येताना आणि जाताना या दोन्ही वेळेला उपस्थितीची नोंद करावी लागणार आहे.

ऑगस्टपासून नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी
SHARES

महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांनंतर आता नगरसेवकांचीही (bmc corporators) हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं नोंदवली जाणार आहे. नगरसेवकांना येताना आणि जाताना या दोन्ही वेळेला उपस्थितीची नोंद करावी लागणार आहे. ऑगस्टपासून ही हजेरी नोंदवली जाणार असून गटनेत्यांच्या बैठकीत निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं हजेरीपटावर सही करून पळ काढणाऱ्या नगरसेवकांना चाप बसणार आहे.

भत्ता कापणार

बायोमेट्रीक या यांत्रिक पद्धतीनं हजेरी न नोंदवल्यास नगरसेवकांची गैरहजरी धरली जाणार असून त्यांचा भत्ताही कापला जाणार आहे. त्यामुळं बायोमेट्रीक पद्धतीनं हजेरी (biometric attendance) नोंदवणं बंधनकारक असणार आहे. मात्र, या निर्णयातून मुंबईचे महापौर (mumbai mayor vishwanath mahadeshwar) आणि उपमहापौर (Deputy Mayor Hemangi Worlikar) यांना वगळण्यात आलं आहे.

बायोमेट्रिक हजेरी सक्ती

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांमध्ये आणि खात्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. त्यानुसार, नगरसेवकांची देखील बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. सभागृहाबाहेर ठेवलेल्या उपस्थितीपटावर सही करून नगरसेवक आत येतात. परंतु, बऱ्याचदा सही करून नगरसेवक सभागृहात न येता परस्पर निघून जातात. त्यामुळं सभागृहाच्या दरवाजावर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशीनसह सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी कोटक यांनी केली होती.

कर्मचाऱ्यांचे पगार कापले

दरम्यान, बायोमेट्रीक या यंत्रणेत होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळं महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार कापले गेले आहेत. तसंच, अनेकदा त्यांच्या हाती कमी पगार आला आहे. त्यामुळं आता या बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयावर नगरसेवक नाराजी व्यक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश

CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा