Advertisement

Coronavirus Updates: पालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी स्थगित

कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याआधी अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली बंद केली आहे.

Coronavirus Updates: पालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी स्थगित
SHARES

राज्यात कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) बायोमेट्रिक हजेरी (biometric attendance) ३१ मार्च २०२० पर्यंत बंद केली आहे.  कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याआधी अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली बंद केली आहे.

कोरोना व्हायरसचा coronavirus) धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी सुरू केलेल्या  बायोमेट्रिक हजेरीला (biometric attendance) ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगिती दिली आहे. या कालावधीत पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवहीत नोंदवली जाणार आहे. नोंदवहीतील नोंद मानव संसाधन कार्यप्रणालीत नोंदविण्यात येणार आहे. मानव संसाधन कार्यप्रणालीतील नोंदविलेली हजेरी आस्थापनाप्रमुखांनी १३ एप्रिलपर्यंत मंजूर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मंजुरी नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदी अनुपस्थिती समजण्यात येणार असून त्यांचे वेतन रोखण्यात येणार आहे.

याशिवाय मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) १५ मार्च २०२० पासून नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत राणीची बाग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी राणीच्या बागेत येऊ नये, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

Corona Virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा