Advertisement

विमान प्रवासासाठी तिकीटाच्या जागी बायोमेट्रीक्स?


विमान प्रवासासाठी तिकीटाच्या जागी बायोमेट्रीक्स?
SHARES

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांतर्गत बस, रेल्वे, मेट्रो, मोनो आणि जलवाहतुकीसाठी एकच तिकीट आणण्याची योजना जाहीर केली. अशा तिकीटामुळे रांगेत वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा वाचून जलद प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेच्या एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकार देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बायोमेट्रीक तिकीट प्रणाली राबवण्याचा विचार करत आहे.

डिजिटल युगात पेपरचा वापर तसा कमीच झाला आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना कुठल्याही कागदपत्रांशिवाय विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. टाइम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय लवकरच प्रवाशांची ओळख असलेल्या आधार आणि पासपोर्ट क्रमांकाचा 'डेटाबेस' सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांशी जाेडणार अाहे.


आधार, पासपोर्ट डेटा विमानकंपन्यांकडे

हा 'डेटाबेस' सर्व विमान कंपन्या आणि विमानतळाशी जोडल्यानंतर विमान प्रवाशांना केवळ बायोमेट्रीकच्या आधारे देशातील कुठल्याही विमानतळावर विनाअडथळा प्रवेश करता येईल. त्यासाठी या प्रवाशांना कुठलेही कागदी ओळखपत्र दाखवण्याची गरज लागणार नाही. यामुळे देशांतर्गत विमानप्रवास अधिक सुलभ आणि सहज होईल.


तिकीटाची गरज नाही

सद्यस्थितीत विमानतळावर गेल्यावर प्रवाशांना तिकीट किंवा त्याची प्रत घेऊन बोर्डिंग पास घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. बोर्डिंग पास घेऊन पुन्हा सामान आणि वैयक्तिक तपासणीसाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर बोर्डिंग पास सोपवून विमानात प्रवेश करता येतो.


थेट विमानात प्रवेश

परंतु नव्या डिजिटल पद्धतीनुसार केवळ बायोमेट्रीक्सच्या आधारे संबंधित प्रवाशाला थेट आपले विमान पकडता येणार आहे. विमानकंपन्या आणि विमानतळ प्राधिकरणाकडे प्रवाशांचा डेटाबेस असल्याने या डेटाबेसच्या आधारेच एखाद्या प्रवाशाने चेकइन आणि सिक्युरिटी चेक केले आहे किंवा नाही हे त्यांना कळू शकेल. त्यानुसारच त्याला पुढे विमानात प्रवेश देण्यात येईल.

त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पुढच्या काही दिवसांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने प्रवेश सुरू झाल्यास आश्चर्यचकीत होऊ नका, तर विनाकटकट, जलद विमान प्रवासासाठी तयार राहा.हेही वाचा -

शिर्डीचा प्रवास करा विमानाने

भारतीय बनावटीचे विमान आकाशात झेप घेण्याच्या तयारीतडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement