Advertisement

शिर्डीचा प्रवास करा विमानाने


शिर्डीचा प्रवास करा विमानाने
SHARES

शिर्डीतल्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अगदी देश-विदेशातून भाविक शिर्डीमध्ये येतात. मुंबईमध्ये साईभक्तांची कमी नाही. काही जण तर विकेंड घालवण्यासाठी नाशिक आणि शिर्डीला येतात.

बस आणि ट्रेनने प्रवास केल्यास ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो. पण आता मुंबईकरांना शिर्डीचा प्रवास विमानाने करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे अंतर पार करण्यासाठी फक्त ४൦ मिनिटे लागणार आहेत. मंगळवारी 26 सप्टेंबरला 'अलायंस एअर एटीआर 72' या विमानतळासाठी ट्रायल घेण्यात येईल.

हे विमान मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान शिर्डीला जाण्यासाठी टेकऑफ घेईल. या ट्रायलच्या दरम्यान डीसीसीएचे अनेक अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहतील. शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 15 ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.


काय आहे साईबाबा विमातळाची खासियत?

  • एयरबस ए-320 आणि बोइंग 737 साठी 2,500 मीटरचा रनवे
  • 2,750 चौरस मीटरचे टर्मिनल स्पेस
  • चार एयरक्राफ्टसाठी हँगर पार्किंग
  • विमानतळापासून साईबाबा मंदिरपर्यंत (15 किलोमीटर) विशेष बस / टॅक्सी सेवा

हेही वाचा - 

आता ४० मिनिटांत गाठा शिर्डी!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा