Advertisement

चला शिर्डीला जाऊ...


SHARES

मुंबई - आता शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना जास्तीतजास्त वेळ रांगेत ताटकळत उभं राहावं लागणार नाही. कारण इलेक्ट्रॉनिक टाइम मॅनेजमेंट सिस्टिम येत्या 12 डिसेंबरपासून शिर्डी साईमंदिरात सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. ते नरिमन पॉइंट इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या इलेक्ट्रॉनिक टाइम मॅनेजमेंट सिस्टमद्वारे भक्तांचे बायोमेट्रिक करून त्यांचे फोटो काढण्यात येईल आणि त्याला दर्शनसाठी एक वेळ दिली जाईल. त्यावेळेत भक्तांना दर्शन घेता येईल. 18 ऑक्टोबर 2018 ला साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव साजरा केला जाणारेय. या शताब्दी महोत्सव वर्षाच्या नियोजनासाठी देशाविदेशातील जास्तीत जास्त साई मंदिरांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभागी व्हावे असं आवाहन हावरे यांनी केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा