Advertisement

आता ४० मिनिटांत गाठा शिर्डी!


आता ४० मिनिटांत गाठा शिर्डी!
SHARES

भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे शिर्डीचे साईबाबा. बाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक शिर्डीमध्ये येतात. मुंबईमध्येही साईबाबांचे कमी भक्त नाहीत. साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो. परंतु आता हे अंतर पार करण्यासाठी फक्त ४൦ मिनिटे लागणार आहेत. आश्चर्यचकित झालात ना? शिर्डीला पोहोचण्यासाठी फक्त ४൦ मिनिटे? हे कसे शक्य आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. लवकरच मुंबई ते शिर्डी विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी शिर्डीमध्ये विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जुलैच्या शेवटच्या आडवड्यात विमानतळाचे उद्घाटनही होण्याची शक्यता आहे. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

शिर्डीमध्ये उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी ३४० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. साईबाबा ट्रस्ट तर्फे ४५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट विमानतळाची देखरेख करणार आहे. अलायंस एअर, इंडिगो या एअर लाईन्सनं शिर्डीमध्ये विमान सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई-शिर्डी विमानसेवेमुळे भाविकांना होणार लाभ

मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी बस, ट्रेन, खाजगी वाहनं अशा सेवा उपलब्ध आहेत. पण या मार्गाने शिर्डीला पोहोचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात. पण मुंबई ते शिर्डी विमान सेवा सुरू झाली, तर हा प्रवास आणखी सुखकर होईल. फक्त ४൦ मिनिटांमध्ये तुम्ही शिर्डी गाठू शकता. शिर्डी विमानतळावरुन साईबाबांचं मंदिर १४ किलोमीटर लांब आहे. शिर्डी विमानतळावर उतरताच तुम्ही खाजगी वाहन करुन १०-१५ मिनिटांत साईबाबा मंदिराजवळ पोहोचू शकाल. विमानसेवा सुरू झाली की अंदाजे ७०० किंवा ८०० भाविक याचा लाभ घेऊ शकतील.

ज्यांच्याकडे अधिक पैसा आणि कमी वेळ असेल, त्यांच्यासाठी विमानसेवा फायदेशीर ठरेल. पण ज्यांच्याकडे अधिक वेळ आहे ते बस, ट्रेन या सेवांचा लाभ अधिक घेतील. मी साईबाबांचा भक्त आहे. माझ्याकडे जास्त वेळ नसतो. त्यामुळे माझ्यासाठी विमानसेवा फायदेशीर आहे.

- योगेश मिश्रा, ट्रॅव्हल कंपनी मालक

२०१८ मध्ये शिर्डीचे साईबाबा यांच्या समाधीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधण्यासाठी लवकरात लवकर विमानतळाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा