आता महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात ‘जननी कक्ष’

महापालिकेच्या कार्याल्यांमध्ये जननी कक्ष सुरू करण्यात यावेत, अशी आपली मागणी असल्याचं आशा मराठे यांनी सांगितलं.

SHARE

बाळाला स्तनपान करता यावं याकरता महाराष्ट्रातील काही प्राचीन मंदिरांमध्ये जननी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचधर्तीवर मुंबई महापालिकेचं मुख्यालय आणि विभाग कार्यालयांमध्ये येणाऱ्या महिलांना नि:संकोचपणे बाळाला स्तनपान करता यावं यासाठी जननी कक्ष स्थापन करण्याची मागणी होत आहे.


भाजपच्या नगरसेविकेची मागणी

भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करत प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यालय आणि विविध विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधेसंबंधातील कामे, करभरणा करणे, जन्म-मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आणि विभागातील काही तक्रारींसंदर्भात नागरिक असतात. यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश असतो. देखभाल करण्यास घरी कोणी नसल्यास बऱ्याचदा काही महिला आपल्या तान्हुल्याला सोबत घेऊन महापालिकेच्या कार्यालयात येतात.

काम पूर्ण होण्यास बराच विलंब होत असल्यामुळे त्यांना आपल्या तान्हुल्याला आडोसा घेऊन स्तनपान करावं लागतं. त्यामुळे बऱ्याच महिलांची फार गैरसोय होते. त्यामुळे महापालिकेच्या कार्याल्यांमध्ये जननी कक्ष सुरू करण्यात यावेत, अशी आपली मागणी असल्याचं आशा मराठे यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

मुंबईचा विकास आराखडा रद्द करा, शिवसेनेची मागणी

संबंधित विषय
ताज्या बातम्या