Advertisement

मुलुंडमध्ये अग्रवाल रुग्णालय बांधकामात दिरंगाई, भाजपा नगरसेवकाचे उपोषण


मुलुंडमध्ये अग्रवाल रुग्णालय बांधकामात दिरंगाई, भाजपा नगरसेवकाचे उपोषण
SHARES

मुलुंड मधील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून भाजपाचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. यासंदर्भात येत्या सोमवारी महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतले.


एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

मुलुंडमधील एम.टी. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्विकास व अत्याधुनिकीकरणास न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याचे होणारे हाल याबाबत मुलुंडकरांच्या हक्काबाबत भाजपाचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारलं होतं. या उपोषणाला खासदार किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंह यांच्यासह भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला होता.



रूग्णालय विकासाला खीळ

या रुग्णालयांच्या पुनर्विकासासाठी काढण्यात येणारी निविदा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या विकासाला खीळ बसली आहे. मुलुंड आणि आसपासच्या काही खासगी रुग्णालयांना फायदा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक या निविदा रद्द केल्या जात असल्याचा आरोप प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे. शुक्रवारी केलेल्या या उपोषणात संध्याकाळी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार सरदार तारासिंह यांनी गंगाधरे यांना लिंबू पाणी पाजल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले.



हेही वाचा

अखेर अग्रवाल रुग्णालयाची इमारत धोकादायक घोषित!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा