SHARE

बाॅलीवुड अभिनेत्री श्रीदेवीचं अकाली निधन झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी त्यांचं नाव अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील मोगरा नाल्यावरील उड्डाणपूलाला दिलं जाणार आहे. के-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष आणि भाजपा नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी मोगरा नाल्यावरील उड्डाणपूलाचं अभिनेत्री श्रीदेवी उड्डाणपूल असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.


महापौरांकडे मागणी

श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये पडून रहस्यमय मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. अशा सुप्रसिध्द अभिनेत्रीच्या स्मृती चिरंतन राहावी म्हणून अंधेरी पश्चिम येथील क्लबलगतच्या लोखंडवाला कॉम्पलेक्समधील महाराणा प्रताप मार्ग येथे असलेल्या मोगरा नाल्यावरील उड्डाणपूलाला श्रीदेवी यांचं नाव देण्याची मागणी योगीदाज दाभाडकर यांनी महापौरांकडे केली आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.


घेतला जाऊ शकतो अाक्षेप

नामवंत चित्रपट अभिनेत्री असलेल्या आणि भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलेल्या श्रीदेवी यांचं नाव नाल्यावरील एका उड्डाणपुलाला देण्याच्या या मागणीवरून आक्षेप नोंदवला जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांचं नाव एका रस्त्याला अथवा चौकाला दिल्यास ते योग्य ठरू शकतं, असं काहींचं म्हणणं आहे.


हेही वाचा -

श्रीदेवीची जागा घेतली धकधक गर्लने!

श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवीने लिहिलं इमोशनल लेटर

संबंधित विषय
ताज्या बातम्या