Advertisement

पूर्व उपनगरातील सफाई न झालेल्या नाल्यांचे भाजपाकडून दर्शन


पूर्व उपनगरातील सफाई न झालेल्या नाल्यांचे भाजपाकडून दर्शन
SHARES

पूर्व उपनगरातील नाल्यांची सफाई 100 टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून झाल्यानंतर भाजपाने गाळ आणि कचऱ्याने भरलेल्या नाल्यांचे दर्शन घडवण्यास सुरूवात केली आहे. मुलुंडमधील पश्चिम येथील 'सिटी ऑफ जॉय' नाल्याचे छायाचित्रच जारी करत भाजपाने शतप्रतिशत नाला सफाईचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा - 

पूर्व उपनगरातील नालेसफाई 100 टक्के हा जोक - भाजपा

100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे


मुंबईतील नालेसफाईचे काम सरासरी 97 टक्के झाल्याचा दावा करत प्रशासनाने पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम 100 टक्के झाले असे म्हटले होते. परंतु पूर्व उपनगरातील शंभर टक्के नालेसफाईचा दावा निव्वळ विनोदच असल्याचे सांगत भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला टार्गेट केले होते. पूर्व उपनगरातील नाल्यांच्या सफाईचा दावा केल्यानंतर भाजपाचे मनोज कोटक यांनी आपण आता नालेसफाई न झालेल्या नाल्यांचे दर्शन नक्कीच घडवू, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मुलुंडमधील 'सिटी ऑफ जॉय' नाल्याची सफाई झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यासह पूर्व उपनगरातील अनेक साफ न झालेल्या नाल्यांची पाहणी करून याचा अहवाल आपण प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षाला देऊ. म्हणजे त्यांनी केलेले दावे किती योग्य आहेत, हे त्यांना कळेल. भाजपा स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी या नाल्याची सफाई पूर्णपणे झालेली नसल्याचे म्हटले आहे. या नाल्याची सफाई यापूर्वी एकदा झाली होती. परंतु पुन्हा एकदा या नाल्यात आसपासच्या झोपडपट्टीतून टाकला जाणारा कचरा यामुळे हा नाला पुन्हा भरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा नाला पुन्हा साफ होणे आवश्यक असून, शत प्रतिशत नालेसफाईचा दावा करणाऱ्यांनी तो त्वरीत साफ करावा,असे म्हटले आहे. या नाल्या व्यतिरिक्त रामगड आणि भिमनगर नालाही कचऱ्याने अजूनही तसाच भरलेला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा