Advertisement

पूर्व उपनगरातील नालेसफाई 100 टक्के हा जोक - भाजपा


पूर्व उपनगरातील नालेसफाई 100 टक्के हा जोक - भाजपा
SHARES

मुंबईतील नालेसफाईचा विषय हा मुंबईकरांसाठी विनोदच असून, सफाईच्या कामाची टक्केवारी सादर करत प्रशासनाने पुन्हा एकदा मुंबईकरांची हसवणूक करुन फसवणूक करण्याचा मार्ग अवलंबला आहे. संपूर्ण मुंबईतील नाल्यांच्या सफाईचे काम हे 94 टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत प्रशासनाने पूर्व उपनगरातील नाल्यांची सफाई चक्क 100 टक्के झाल्याचे जाहीर केले आहे. अर्थात, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या 60 टक्के सफाईच्या कामाची 100 टक्के सफाई झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. तरी अजूनही मुलूंड, घाटकोपर आदी भागांमधील नाले कचऱ्याने भरलेलेच पाहायला मिळत आहेत.

मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांची सरासरी सफाई 94.31 टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरातील नालेसफाई 93.73 टक्के, पश्चिम उपनगरात 91.39 टक्के आणि पूर्व उपनगरात 100 टक्के एवढी सफाईची कामे झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे, तर मिठी नदीचे काम 90.83 टक्के एवढे पूर्ण झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दोनच दिवसांपूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सभागृहनेते यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी पूर्व उपनगरातील नाले सफाईच्या कामाची पाहणी केली होती. या नालेसफाईच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करतानाच ज्या ज्या नाल्यांमध्ये तरंगता कचरा आढळून आला होता, तो त्वरीत काढून काठावर काढून ठेवलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली होती.


हेही वाचा

मुंबईतील नालेसफाई, रस्त्यांची कामे अर्धवटच

78 टक्के नालेसफाई पूर्ण, मुंबई महापालिकेचा दावा

100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे


पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम 100 टक्के झाल्याच्या प्रशासनाच्या दाव्यावर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा जोक आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. महापौरांनी पूर्व उपनगरातील नालेसफाई पाहणीचा दौरा केल्यानंतर त्यांना असे नाले साफ झाल्याचे आढळून आल्यानंतर त्या आधारे जर प्रशासन बोलत असेल तर माहीत नाही. परंतु अजूनही नाले पूर्ण साफ केले जात नाहीत. अजूनही गाळाने आणि कचऱ्याने नाले भरलेले आहेत. नाल्याच्या शेजारी गाळ काढून ठेवलेला आहे. तरीही त्यांना जर ही सफाई शंभर टक्के झाल्याचे वाटत असेल तर यापेक्षा दुसरा विनोद नाही. महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर आणि प्रशासनाच्या दाव्यानंतरही जर मुंबईत पाणी तुंबले तर याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाची राहणार आहे. प्रशासनाकडून काम करून घेण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरत आहे आणि टक्केवारीची भाषा ते लोक बोलत आहेत, अशा शब्दात भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी समाचार घेतला आहे. 

उद्धव ठाकरे हे 100 टक्के नालेसफाई होऊ शकत नाही, असे सांगतात आणि प्रशासन 100 टक्क्यांचा दावा करते यावर नक्की आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? असाही सवाल कोटक यांनी उपस्थित केला आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा दावा प्रशासन करत असून, त्यांच्या दाव्यानंतरही जर नालेसफाई झालेली नसेल तर ती आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून करायला भाग पाडणार असल्याचे सांगितले. परंतु दावा करूनही जर सफाई केली जात नसेल तर प्रशासनातील अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असेही खडेबोल त्यांनी यावेळी सुनावलेत. सत्ताधारी पक्ष म्हणून आम्हाला आमची जबाबदारी माहीत आहे, याची जाणीव आम्हाला कुणी करून देण्याची गरज नाही, अशा शब्दातही भाजपा गटनेत्यांचा त्यांनी समाचार घेतला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा