Advertisement

महिलांच्या अशोभनीय प्रदर्शनाच्या जाहिरातींवर बंदी घाला; भाजपाची मागणी


महिलांच्या अशोभनीय प्रदर्शनाच्या जाहिरातींवर बंदी घाला; भाजपाची मागणी
SHARES

मुंबईसह देशात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंग होण्याचे प्रकार वाढत आहे. यासर्व प्रकाराला महिलांच्या अशोभनीय प्रदर्शनाच्या जाहिरातीच कारणीभूत असल्याचे सांगत भाजपाने यावर त्वरीत बंदी घालण्याची मागणी केली आहे.


कडक बंधनं घाला

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राम बारोट यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे वर्तमानपत्रे, जाहिरातफलक तसेच विविध माध्यमातून दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये होणाऱ्या स्त्रियांच्या अशोभनीय प्रदर्शनावर आळा घालता येईल, अशा रितीने अशा जाहिरातींच्या प्रदर्शनावर कडक बंधने घालण्याची मागणी केली आहे.


विकृत मनोवृत्ती बळावते 

देशात स्त्रिया व अल्पवयीन मुलींवर बलात्कार व विनयभंग होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काही छापील अथवा अन्य माध्यमातील जाहिरातींमध्ये स्त्रियांचे करण्यात येणारे अशोभनीय प्रदर्शन असल्याचं बारोट यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारच्या छापील जाहिरातींमुळे जनसामान्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊन, त्यांच्यातील विकृत मनोवृत्ती बळावते आणि स्त्रिया, अल्पवयीन मुली यांच्यावर बलात्कार व  विनयभंगाच्या दुर्देवी घटना घडतात, असं त्यांनी म्हटलं आहे.


निर्णय नाही

पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या तत्कालीन नगरसेविका रितू तावडे यांनी दुकानांमध्ये प्रदर्शित करण्यात येणाऱ्या मॅनिक्वीनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु अशाप्रकारची बंदी घालण्याचे अधिकार महापालिकेला नसल्यामुळे अनेक प्रस्ताव दाखल करूनही यावर निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे या ही मागणीचे असेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा - 

शिवसेना-भाजपात चढाओढ: गणेशोत्सव मंडळांच्या ऑनलाईन अर्जांची मुदतवाढ ५ सप्टेंबरपर्यंत

शनिवारी सकाळी ६ वाजता सुटणार पहिली मोनो




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा