Advertisement

मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागण्याची शक्यता, आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे.

मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागण्याची शक्यता, आदित्य ठाकरे म्हणाले...
SHARES

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. याचं कारण म्हणजे सामन्यांसाठी बेस्टचा प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे. किमान तिकीट साधी बस 7 रुपये तर एसी बसचे 10 रुपये होणार आहे. सध्या साध्या बसचे किमान तिकीट 5 रुपये तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट 6 रुपये आहे.

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेने दरवाढ सूचवली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र पालिकेने पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे पर्याय सूचवले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर बेस्ट बसच्या प्रवाशांना दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान या संदर्भात मुंबईतील आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बेस्टच्या बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. भाजप हे मुंबईविरोधी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे.

साधारण बसेस 

  • 5 किमी - 5 रुपये
  • 10 किमी - 10 रुपये
  • 15 किमी - 15 रुपये
  • 20 किमी व पुढे 20 रुपये

एसी बसचे दर

  • 5 किमी - 6 रुपये
  • 10 किमी - 13 रुपये
  • 15 किमी - 19 रुपये
  • 20 किमी व पुढे 25 रुपये

हेही वाचा

दादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार

‘बेस्ट’ला झटका, तीन हजार कोटी देण्यास पालिकेचा स्पष्ट नकार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा