Advertisement

मीरारोड येथील फुड किंगमध्ये स्फोट, सहा जण जखमी


मीरारोड येथील फुड किंगमध्ये स्फोट, सहा जण जखमी
SHARES

मीरा रोड पूर्व येथील सिने प्राईम माॅलजवळील फुड किंग हाॅटेलमध्ये रविवारी दुपारी स्फोट झाला. या स्फोटात हाॅटेलमध्ये काम करणारे सहा जण जखमी झाले असून यातील चार जण गंभीर आहेत. प्रल्हाद बिहरा (२४), रंजन बिहरा (२६) , कबीर (२६) ,बत्ताबुद्धीन (२३), बत्ताबुद्धीन (२७) अशी जखमींची नावे अाहेत.  जखमींना मिरारोड येथील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कमी तीव्रता

दुपारी बाराच्या सुमारास सिने प्राईम माॅल येथील फुड किंग माॅलला आग लागल्याची माहिती मिळाल्याबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र यावेळी कुठंही आग दिसून आली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता कमी तीव्रतेचा स्फोट झाल्याचं दिसून आलं. एसीचा स्फोट वा शाॅर्ट सर्कीटचा प्रकार वा मोठा स्फोट वा आग असं काहीही इथं घडलं नव्हतं. पण आजूबाजूच्या काचा फुटलेल्या आणि सहा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याच्या अवस्थेत दिसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. 



हेही वाचा -

मिसेस सीएमनाही सेल्फीचा मोह आवरेना; 'त्या' डेंजर सेल्फीवरून अमृता फडणवीस ट्रोल

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा