Advertisement

पेंग्विनच्या देखभालीसाठीच्या १५ कोटींच्या निवेदेस पालिकेची मंजुरी

मनसे आणि भाजपसह या निवेदेस काँग्रेसकडूनही विरोध दर्शवला गेला होता. विरोध झुगारून पालिकेकडून निविदेस मंजुरी देण्यात आली आहे.

पेंग्विनच्या देखभालीसाठीच्या १५ कोटींच्या निवेदेस पालिकेची मंजुरी
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी समितीनं भायखळा प्राणी संग्रहालयातील पेंग्विन्सच्या तीन वर्षांसाठीच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेनं या प्रस्तावाला मंजुरी दिली. तर, भाजपनं मात्र देखभाल खर्च खूप जास्त असल्याचं कारण देत याला विरोध दर्शवला होता. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही या निविदेस विरोध दर्शवला गेला होता.

या निविदेवरून भाजपा आणि काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला आणि पालिका प्रशासनाला लक्ष्य केलं होतं. हा १५ कोटी रुपये खर्च म्हणजे पालिकेचा तोटा असल्याची टीका दोन्ही पक्षांनी केली होती. मात्र हा विरोध झुगारून पालिकेकडून निविदेस मंजुरी देण्यात आल्याचं दिसत आहे.

तर, भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीची बाग) पेंग्विन दाखल झाल्यापासून प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. पेंग्विन आल्यानंतर २०१७ पासून पालिकेला १२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

२०१४ ते २०१७ या तीन वर्षांत मिळून दोन कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र पेंग्विन आल्यानंतर एप्रिल २०१७ पासून मार्च २०२० पर्यंतचे पालिकेचे एकूण उत्पन्न १४.३६ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच पेंग्विनमुळे निव्वळ १२.२६ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केलेला आहे.



हेही वाचा

दोन डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी जाताय? 'इतका' दंड आकारणार

पालिका कार्यालयात १ जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी लागणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा