Advertisement

एका दिवसात ४१४ उपहारगृहांची तपासणी, २ सील, १२३ सिलेंडर जप्त


एका दिवसात ४१४ उपहारगृहांची तपासणी, २ सील, १२३ सिलेंडर जप्त
SHARES

कमला मिल आग प्रकरणानंतर सुरू झालेली अनधिकृत बांधकामांविरोधातील मुंबई महानगर पालिकेची कारवाई सलग पंधराव्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी पालिकेच्या ५२ टीमने दिवसभर कारवाई करत ४१४ उपहारगृहांची तपासणी केली आहे. या तपासणीत अग्निसुरक्षेच्या उपाययोजना न केल्याचं निदर्शनास आल्यानं २ उपहारगृह सील करण्यात आली आहेत. तर १२३ सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.


२४ विभागांमध्ये करण्यात आली कारवाई

२४ विभागांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ४१४ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली. यातील १२० ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळून आल्यानं हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. तर २१४ उपहारगृहांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय तपासणी पथकानं १२३ अवैध सिलेंडर जप्त केले आहेत.



ए विभागात १७, सी विभागात १८, डी विभागात ६१, इ विभागात १, एफ दक्षिण विभागात ८, एफ उत्तर विभागात १६, जी दक्षिण विभागात २, जी उत्तर विभागात १०, एच विभागात ७, एच विभागात १३, के पूर्व विभागात ८१, के पश्चिम विभागात २०, पी दक्षिण विभागात ९, पी उत्तर विभागात २२, एल विभागात २७, एम पूर्व विभागात १२, एम पश्चिम विभागात १९, एऩ विभागात १६, एस विभागात १८, आर दक्षिण विभागात ७, आर मध्य विभागात १२ आणि आर उत्तर विभागात १३ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली आहे.


दोन हॉटेलांना ठोकलं सील

सील करण्यात आलेल्या दोन उपहारगृहांपैकी एक उपहारगृह एच पश्चिम विभागातील दुसरं उपहारगृह जी उत्तर विभागातील आहे. कारवाई झालेल्यांमध्ये भारत बार, व्हाईट हाऊस, ग्रेट पंजाब, बॉम्बे हिंदू हॉटेल, बांबू शॉट, कॅफे मरोळ, दरबार, साई लिला, अंकल किचन, कसबा, एसएस फूड, उडपी विहार या उपहारगृहांचा समावेश आहे.



हेही वाचा

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी मोजोससह वन अबव्हही दोषीच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा