कमला मिल आग: महापालिकेची धडक कारवाई, मुंबईतील ५५ हॉटेल्स सील

  Mumbai
  कमला मिल आग: महापालिकेची धडक कारवाई, मुंबईतील ५५ हॉटेल्स सील
  मुंबई  -  

  कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर मुंबईत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईदरम्यान मुंबई महापालिकेने शनिवारपर्यंत ५५ हॉटेल्स सील केली आहेत. तर सुमारे अडीच हजार हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत आढळलेल्या बेकायदा बांधकावर हातोडा चालवून महापालिकेने ९१३ हॉटेल्सवर कारवाई केली आहे.


  विशेष तपासणीची आकडेवारी

  मुंबईत ३० डिसेंबर २०१७ पासून हॉटेल्स, पब, रेस्टाॅरंटची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेष तपासणी करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार ५६८ हॉटेल्सची संयुक्तपणे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आलेल्या ५५ हॉटेल्सना ‘सील’ ठोकण्यात आलं आहे. याशिवाय अनधिकृत बांधकाम आढळलेल्या ९१३ हॉटेल्स, पब आणि जिमखान्यांमध्ये तोडक कारवाई करण्यात आली आहे. ही तोडक कारवाई करतानाच ७१८ हॉटेल्सना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आलं आहे.


  कुणावर कारवाई?

  मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यास संबंधित आस्थापना तात्काळ सील करण्यात येत आहे. यामध्ये जी दक्षिण विभागातील फूड लिंक रेस्टॉरंट, एच पश्चिम विभागातील लजीज, सोशल, वॉण्टन, जाफरान व मार्क्स ऍण्ड स्पेन्सर्स, बी विभागातील आजवा स्वीट व हादीया स्वीट आदी हॉटेल्सचा समावेश आहे.  हेही वाचा-

  संघटनांचे सदस्य नसलेली हॉटेल्स होणार टार्गेट, महापालिकेचा इशारा


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.