Advertisement

ग्रँट हयातजवळ २५० झोपड्यांवर महापालिकेचा बुलडोझर; स्थानिकांचा विरोध

पात्र कुटुंबांना पर्यायी जागा दिल्यानंतरही ही जागा सोडण्यास या रहिवाशांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मंगळवारी येथील सर्व झोपड्यांवर कारवाई करून रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला करण्यात आला.

ग्रँट हयातजवळ २५० झोपड्यांवर महापालिकेचा बुलडोझर; स्थानिकांचा विरोध
SHARES

सांताक्रुझ पूर्व येथील विद्यापीठाशेजारील रस्ते रुंदीकरणात आड येणाऱ्या आंबेडकर चौक येथील झोपड्यांवर मंगळवारी महापालिकेने धडक कारवाई केली. येथील सर्व पात्र कुटुंबांना पर्यायी जागा दिल्यानंतरही ही जागा सोडण्यास या रहिवाशांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मंगळवारी येथील सर्व झोपड्यांवर कारवाई करून रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला करण्यात आला. दरम्यान, या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुनर्वसन करूनही कुटुंबांचा घरातच ठिय्या

सांताक्रुझ पूर्व येथील विद्यापीठ गेट क्रमांक १ पासून हंस भुग्रा मार्गावरील ग्रॅंट हयात हॉटेल परिसरातील आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या कुटुंबांना माहुल येथे पर्यायी घरे देण्यात आल्यानंतरही लोकांकडून या घरांचा ताबा सोडला जात नव्हता. त्यामुळे या सर्व मंगळवारी झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.


अखेर महापालिकेची कारवाई

आंबेडकर चौक परिसरात सुमारे २५० झोपड्या होत्या. त्यातील १९० कुटुंबांना माहुल येथे पर्यायी घरे देण्यात आली आहेत. चार महिन्यांपूर्वी या सर्व कुटुंबांना या घरांच्या चाव्या देऊनही ते याच ठिकाणी राहत होते. त्यामुळे पुनर्वसन केलेल्या १९० पात्र कुटुंबांसह अपात्र बांधकामांवर महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी दिली. महापालिकेच्या कामगार, कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. सध्या येथील रस्ता हा २० ते २५ फूट रुंदीचा असून अतिक्रमण हटवल्यामुळे तो आता ४० फूट रुंदीचा करता येणार आहे.


कारवाईच्या आड येणाऱ्यांवर गुन्हा

सांताक्रूझ पूर्वेला पालिकेतर्फे पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईआड येणाऱ्यांवर बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका महिला सामाजिक कार्यकर्तीसह काही रहिवाशांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जमावाला बाजूला करण्यासाठी पोलिस पुढे सरसावल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एका महिलेने गस्तीवर असलेल्या महिला पोलिस शिपाई स्वाती तोडकरच्या हाताचा चावा घेतला. त्यावेळी बीकेसी पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी महिला पत्रकारासह काही रहिवाशांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.



हेही वाचा

माहुल प्रकल्पबाधित वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद

पर्यायी जागा देऊनही त्यांनी केलं पुन्हा बांधकाम, महापालिकेची २० वर्षांनंतर कारवाई!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा